Home स्टोरी कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची धडक…!

कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची धडक…!

167

मालवण: मालवण सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पुनम जगदाळे यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यानी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या. तसेच या प्रकरणी या संबंधित दोशींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर आदि उपस्थित होते. यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात ३ हजारात होणारी शस्त्रक्रियेला २७ हजार कसे लागतात? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या नेत्रालयावर धडक दिल्यानंतर नेत्रालयाचे शटर बंद करण्यात आले.