गेला महिनाभर चर्चेत असलेली आणि काही राजकीय नेत्यांसाठी खूप महत्वाची ठरलेली कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालआज लागणार आहे. आज दि. २ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाम मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.