Home स्टोरी पळसंब येथे स्वामी श्री श्री ऋषिकेश वैद्य गुरुजी यांचा २६ डिसेंबर रोजी दर्शन...

पळसंब येथे स्वामी श्री श्री ऋषिकेश वैद्य गुरुजी यांचा २६ डिसेंबर रोजी दर्शन सोहळा…!

80

मसुरे प्रतिनिधी: पळसंब येथे श्री जयंती देवी मंदिर येथे २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता श्री जगन्नाथ पुरी पिठाच्या शंकराचार्यांचे शिष्य स्वामी श्री श्री ऋषिकेश वैद्य गुरुजी श्री जयंती देवीच्या दर्शनाला येत आहेत. यावेळी श्री महेश कापडी आपल्या विद्यार्थ्यांसह स्वतः उपस्थित राहणार आहेत.

श्री ऋषिकेश वैद्य गुरुजी हे महनीय व्यक्ती असून यांचे चरणकमल गावाला लागत आहेत ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. तरी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.