Home स्टोरी कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक ; दोन गाड्या उशिराने धावणार

कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक ; दोन गाड्या उशिराने धावणार

132

२५ डिसेंबर वार्ता: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागांदरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे अडीच तास हा मेगाब्लॉक चालणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

 

रेल्वे नंबर ०२१९७ Coimbatore Jn. – Jabalpur Special ( कोईम्बतूर जं. – जबलपूर विशेष ) ही दिनांक २५ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कणकवली ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. तर रेल्वे नंबर १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.