कणकवली: प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिराची उभारणी पूर्ण झाली आहे. प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना दिनांक २२ जानेवारी २०२४ ला होणार आहे. त्या निमित्ताने कणकवली शहरात प्रभू श्री राम यांची भव्य मिरवणूक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याचे आयोजन समीर नलवडे मित्रमंडळ व गोट्या सावंत मित्रमंडळच्या वतीने करण्यात येणार असून याचा सर्व राम भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर करू, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली आहे.







