Home स्टोरी दोडामार्ग तालुक्यामध्ये अढळला कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण…!

दोडामार्ग तालुक्यामध्ये अढळला कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण…!

69

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. मात्र, हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये असे आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .दोडामार्ग तालुक्यातील एका ४१ वर्षीय पुरुष २० नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे केलेल्या कोरोना चाचणी मध्ये कोरोनाच्या जेएन. १ या नव्या प्रकारातील पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. मात्र या चाचणीला आता एक महिना होऊन गेला असून तो रुग्णही पूर्णपणे बरा असून घरी आहे. तरीदेखील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.