श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचा उपक्रम….
मसुरे प्रतिनिधी:
मल्लखांब हा शारिरीक खेळ शरीराला लवचिकता आणि ताकद देतो.हीच गरज जाणून हल्लीच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना घरातून मैदानात आणण्यासाठी पळसंबमधील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाने पळसंब येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या आवारात मल्लखांब उभारून पळसंब गावात एका नव्या उपक्रमाचा प्रारंभ केला.सातवन झाडापासून बनवलेला मल्लखांब पाहून मुले उत्साहित झाली.लगेचच शाळेतील मुलांनी मल्लखांबावर प्रात्यक्षिके सुद्धा केली.यावेळी मुख्याध्यापक विनोद कदम, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष रविकांत सावंत, शिक्षिका पवार मॅडम, बागवे मॅडम, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, खजिनदार वैभव परब,सचिव चंद्रकांत गोलतकर, सहसचिव शेखर पुजारे, अमित पुजारे, अक्षय परब, बबन पुजारे, हितेश सावंत, दत्तगुरु परब, रमेश मुणगेकर तसेच शाळेतील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती .
मल्लखांब हा प्राचीन मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. ज्याचा उद्देश कुस्तीपटू आणि प्राचीन योद्धांसाठी प्रशिक्षण मदत म्हणून आहे. ’मल्ल’ म्हणजे कुस्ती आणि ’खांब’ म्हणजे खांब. एकत्र, मल्लखांब म्हणजे खांबावर कुस्ती, मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास योग्य खेळ मलखांब आहे.तसेच गावातील इतर मुलांनी या खेळाचा आनंद लुटावा असे आवाहन श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळ, पळसंबचे अध्यक्ष उल्हास सावंत यांनी केले आहे.