सिंधुदुर्ग: दिव्यांगांसाठी व्हील चेअर, अंध काठी, कानाची मशीन, जयपूर फुट आदी जीवनोपयोगी साधनांसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर आणि अर्चना फौंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या दृष्टीने रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध केला जाईल. अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी दिली. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन दिव्यांग सेनेने माडखोल भगवती हॉल येथे आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्यात सौ. अर्चना घारे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, भाईसाहेब सावंत संस्थेचे सचिव गणेश बोर्डेकर, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय देसाई, माडखोल उपसरपंच कृष्णा उर्फ जिजी राऊळ, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, जीवन लाड, माजी सरपंच सुर्यकांत राऊळ, संजय शिरसाट, संजय लाड, पारपोली उपसरपंच संदेश गुरव, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ रेवती राणे, शहर अध्यक्ष देवा टेमकर, श्री. मेमन, दिव्यांग सेना जिल्हा सचिव अमित गोडकर, मालवण तालुकाप्रमुख सत्यम पाटील, अमोल राऊळ, दिलिप मालंडकर, संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनिता राऊळ, कैलास ठाकूर, राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेलचे अध्यक्ष बाबाजी पास्ते, तालुकाध्यक्ष स्वप्निल लातये, विकास लातये, प्रवीण राऊळ, सुरेश राणे, दिपक राऊळ, महेंद्र चव्हाण, घनश्याम पडते, आबिद नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी पुंडलिक दळवी यांनी दिव्यांग बांधवानी खचून न जाता एकत्र येणे हि काळाची गरज असुन दिव्यांग बांधवानी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रात यश संपादन केलेले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. गणेश बोर्डेकर यांनी संजय देसाई दिव्यांग बांधवांसाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत त्यांची दिव्यांग बांधवांच्या प्रति काम करण्याची तळमळ आणि जिद्द हि दिव्यांग बांधवांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. जिजी राऊळ यांनी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगून ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग बांधवांचा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजन पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे आदी मान्यवरांनी संजय देसाई यांच्या कार्याचे कौतुक करीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सुर्यकांत राऊळ यांनी दिव्यांग भगिनी कु. सुप्रिया राऊळ हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड यांनी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई यांच्या दिव्यांग बांधवांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई यांनी दिव्यांगांच्या संजय गांधी पेन्शन योजना ,दिव्यांग प्रमाणपत्र, स्वयंरोजगार, अंत्योदय योजना, दिव्यांग अधिनियम कायदा २०१६ याबाबत दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांग बांधवांच्या समस्या गावातच सोडवण्यासाठी प्रत्येक गावात दिव्यांगांची कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगून १५ डिसेंबरपूर्वी दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजना, संजय गांधी योजनेच्या हयातीच्या दाखल्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास सर्व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या मेळाव्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृष्णा ऊर्फ जिजी राऊळ, अर्चना घारे परब, दिव्यांग उद्योजक शैलेश नारकर, माजी सरपंच संजय लाड, सुर्यकांत राऊळ, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजित जाधव यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याचे सुत्रसंचालन केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी तर आभार शैलेश लातये यांनी मानले.