Home स्टोरी यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप यांना ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’...

यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप यांना ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार जाहीर

135

सावंतवाडी: यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ESFE आणि महाराष्ट्र शिक्षण विभागच्या सहकार्याने आयोजित स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2023 कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट प्राचार्य (सावंतवाडी) विभाग) हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप यांना जाहीर झाला आहे. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी नेहमीच आपल्या कौशल्याने आणि नेतृत्व शैलीने महाविद्यालयाच्या प्रगतीत योगदान दिले आहे.

हा प्रतिष्ठित पुरस्कार केवळ गुणवत्तेच्या आधारावर, शिक्षणातील उत्कृष्टतेची ओळख आहे. आमदार प्रसाद लाड आणि MFDC निधी लिमिटेडचे अध्यक्ष फिरोज मसुलदार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात आज दि. बुधवार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी BKC, मुंबई येथे हा मानाचा पुरस्कर प्रदान करण्यात येईल.

 

प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल ‘बीकेसी’चे शिल्पकार आणि कार्यकारी अध्यक्ष श्री. अच्युत सावंत-भोंसले, अध्यक्षा सौ. अस्मिता सावंतभोंसले, सचिव श्री. संजीव देसाई, प्रशासकीय समन्वयक सुनेत्रा फाटक यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी बांधवांनी अभिनंदन केले आहे.