Home स्टोरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे आकर्षण….!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे आकर्षण….!

203

किल्ले राजकोट परिसराला पर्यटन नगरीचे रूप: पहिल्याच दिवशी शिवपुतळा पाहण्यासाठी मोठी गर्दी 

 

 

मालवण प्रतिनिधी: 

मालवण शहरातील मेढा राजकोट येथे किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी मंगळवारी मालवण येथील नागरिकांसह पर्यटकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भेट दिली.

 

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराज्यांच्या या पुतळ्याचे अनावरण झाले होते. तर अनावरण पूर्वी याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. मंगळवारी सकाळ पासूनच पुतळा पाहण्यासाठी गर्दी होती.

 

नौदल दिनाच्या निमित्ताने किल्ले राजकोट नूतनीकरण तसेच 43 फूट उंच शिवपुतळ्याची उभारणीभा रतीय नौदल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण झाले अन देशाच्या कांनाकोपऱ्यात मालवण राजकोट पोहचला. त्यामुळे येथील शिवपुतळ्याच्या ठिकाणी भेट देण्याची उत्सुकता सर्वाना आहे.

एकूणच मेढा राजकोट परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त होत आहे.

 

किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण किनारपट्टीवर किल्ले राजकोटची उभारणी केली होती. बहुतांशपणे ढासळलेल्या या किल्ल्याचा परिसर गेली अनेक वर्षे काहीसा दुर्लक्षित होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रशासन आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे स्थान निश्चित झाले. किल्ले राजकोट पुनःबांधणी झाली आणि भव्यदिव्य पुतळ्याची उभारणी झाली. महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. एकूणच राजकोट परिसराला पर्यटन नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात हे ठिकाण पर्यटनाचे केंद्र ठरेलं असा विश्वास व्यक्त केला जात आहे.