Home स्टोरी आ. वैभव नाईक यांनी घोटगे वासियांची ६० ते ७० वर्षांची साकवाची मागणी...

आ. वैभव नाईक यांनी घोटगे वासियांची ६० ते ७० वर्षांची साकवाची मागणी केली पूर्ण

110

सोनवडे तर्फ कळसुली येथील श्री रवळनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी दिला १० लाख रु निधी…!

दोन्ही कामांचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन….!

 

सिंधुदुर्ग: गेली ६० ते ७० वर्षे मागणी होत असलेला घोटगे मळेवाडी विठ्ठलमंदिर येथील साकव आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केला आहे.या साकवाच्या बांधकामासाठी ६० लाख रु निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन शुक्रवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले. त्याचबरोबर सोनवडे तर्फ कळसुली येथील श्री रवळनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी देखील आ. वैभव नाईक यांनी १० लाख रु निधी दिला आहे. या कामाचे देखील भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.

घोटगे गावातील मळेवाडी हि नदीच्या पलीकडे असल्याने आणि नदीवर साकव नसल्याने पावसाळ्याच्या कालावधीत येथील नागरिकांना नदीच्या पाण्यातून गावात ये-जा करावी लागते. गेली ६० ते ७० वर्षे येथील नागरिक याठिकाणी साकव बांधण्याची मागणी करत आहेत याआधीच्या अनेक नेत्यांनी साकव बांधण्याची आश्वासने दिली मात्र त्याची पूर्तता झाली नाही. गावातील शिवसैनिकांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे मागणी केल्यानंतर नागरिकांची गरज ओळखून आ. वैभव नाईक यांनी साकवासाठी ६० लाख रु मंजूर करून घेतले आहेत. पावसाळ्या आधी हा साकव पूर्ण करण्यात येणार आहे.

यावेळी घोटगे येथे उपतालुकाप्रमुख महेश सावंत, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ,घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, तेजस भोगले,सुधीर नाईक,अविनाश नाईक, वामन चव्हाण, राजू सावंत,पी. डी. सावंत,अभिषेक सावंत,फ्रेचर मान्येकर,सोनवडे येथील शाखा प्रमुख गुरु मेस्त्री, काशीराम घाडी, दीपक घाडी,रुपेश घाडी,भिकाजी चव्हाण,अरविंद पवार,शांताराम घाडी, प्रसाद कालेकर,

घोटगे येथील निलेश परब, उत्तम वाडकर, भाई नेमाने,गणेश हदगे, विजय साळगावकर,रमेश नाईक, सीताराम निंबाळकर, संतोष सावंत, मनोहर निंबाळकर, गणपत निंबाळकर, मधुकर लाड,संतोष सूद, भाई पन्हाळकर, राजू परब, राजा भांमट, रमेश रेडकर, रमेश ढवळ, सत्यवान ढवळ, हर्षल जाधव, सुहास नेरुरकर, भास्कर धुरी, महादेव सावंत,संतोष सावंत, सुमित सावंत, तुकाराम घाडी, भाविका धुरी, विलास ढवळ, पॉल वॉल, राजू मान्येकर, जयश्री मडवळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.