२४ नोव्हेंबर वार्ता: संस्कृत शिकवणे, वाचणे हे आपण विसरलो आहेत. आम्ही इतके आधुनिक विचारांचे झालो आहोत की, मुलांना फ्रेंच आणि इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही, असे मत अभिनेत्री ईशा तलवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
संस्कृत भाषेमुळे अन्य भाषा समजण्यास साहाय्य होते !
ईशा तलवार यांनी पुढे म्हटले की, मला वाटते की, संस्कृत भाषेचे ज्ञान आपल्याला दुसर्या भाषा समजण्यात पुष्कळ साहाय्य करते. तुम्ही ज्या भाषेमध्ये काम करत आहात, त्या वेळी तुम्हाला अभिनय करतांना त्याच भाषेत विचार करावा लागतो. जर मी हिंदी चित्रपटामध्ये काम करत आहे आणि इंग्रजीमध्ये विचार करत असीन, तर माझ्या अभिनयात माझ्या चेहर्यावर तसेच भाव निर्माण होतील. त्यामुळे ज्या भाषेत काम करत आहात, ती शिकायला हवी.
प्रत्येक कलाकाराला थोड्याफार प्रमाणात संस्कृत आली पाहिजे !
तलवार म्हणाल्या की, मी मुंबईत कॉन्व्हेंट शाळेत शिकले; मात्र मी नंतर स्वतंत्रपणे संस्कृत शिकले. पुण्यातील एका शिक्षिकेने मला संस्कृतमध्ये श्रीमद्भगवतगीता शिकवली. गेल्या १२ वर्षांपासून मी गीतेचे नियमित पठण करत आहे. संस्कृत देवभाषा आहेच, तसे तिला वैज्ञानिक महत्त्वही आहे.
Home स्टोरी आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत...