Home स्टोरी एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

201

२२ नोव्हेंबर वार्ता: एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्‍हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्‍ये चालकाकडून घडल्‍यास त्‍यांच्‍यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.

 

एस्.टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले म्‍हणाले की, एस्.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास म्‍हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्‍वासार्हता जपण्‍यात एस्.टी.च्‍या निर्व्‍यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणार्‍या चालकांचा मोठा वाटा आहे. गेल्‍या काही दिवसांत एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे, हेडफोन घालून गाणी ऐकणे, ‘व्‍हिडिओ’ पहाणे अशा चालक अन् प्रवासी यांच्‍या दृष्‍टीने धोकादायक कृत्‍यामुळे बसमधील प्रवाशांच्‍या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याविषयी सामाजिक माध्‍यमांतून, लोकप्रतिनिधींकडून तक्रारी एस्.टी. महामंडळाकडे प्रविष्‍ट झाल्‍या आहेत. यापुढे अशा घटना निदर्शनास आल्‍यास संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्‍याचे निर्देश एस्.टी.च्‍या वरिष्‍ठ प्रशासनाने दिले आहेत.