Home स्टोरी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खानदेशी पद्धतीने सन्मान….

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खानदेशी पद्धतीने सन्मान….

243

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आज तमाम खानदेशवासिंयाकडून धुळे जिल्ह्यातील नगाव येथील शेतकरी श्री. युवराज यशवंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचा खानदेशी पद्धतीने शाल, श्रीफळ व बुके देत यथोचित सन्मान केला.  हा सन्मान खानदेशातील तमाम शेतकरी बांधवांतर्फे असल्याचे त्यांनी नमूद करत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना खानदेशात येण्याचे निमंत्रणही दिले.

 

 

यावेळी शिक्षणमंत्र्री दीपक केसरकर यांनीही स्मितहास्य करत लवकरच आपण खानदेशात येणार असून तमाम खानदेशवासियांच्या भावना जाणून घेणार असल्याचे सांगितले. या सत्कार समारंभ प्रसंगी सावंतवाडीचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उमाकांत वारंग, प्रा. रुपेश पाटील, मंत्री केसरकर यांचे स्थानिक स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.