लक्ष्मीपूजनानिमित्त मतदारसंघातील नागरिकांच्या घेतल्या गाठी भेटी….
कणकवली: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत दीपावली साजरी करत निवासस्थानी व कार्यालयात लक्ष्मीपूजन केले. यावेळी पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक उपस्थित होते.
त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी लक्ष्मीपूजनाला उपस्थिती दर्शवत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या. ओमसाई मित्रमंडळ मच्छिमार्केट कुडाळच्या वतीने आयोजित केलेल्या तिरंगी डबलबारी भजनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शहर प्रमुख संतोष शिरसाट,नगरसेवक उदय मांजरेकर,सचिन काळप,दीपक आंगणे,राजू गवंडे,गुरु गडकर,अमित राणे,स्वप्नील शिंदे गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.