श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रीडा मंडळाचा उपक्रम
मसुरे प्रतिनिधी:
पळसंब येथील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रीडा मंडळाने दिवाळी निमित्त प्रत्येक घरी उटणे पॉकेट वाटप करत एक वेगळा उपक्रम राबविला आहे. एकूण 300 पॉकेट उटणे वाटण्यात आले. दिवाळी म्हणजे मानवाच्या आयुष्यात तेज, ऊर्जा, चैतन्य घेऊन येणारा सण. या दिवाळी सणात पहिल्या पहाटे अभ्यंग स्नानाला मोठे महत्व आहे. हे अभ्यंग स्नान उटण्याने करण्याची परंपरा कित्येक वर्षे चालत आलेली आहे. या वर्षी पळसंब येथे दिवाळी सणाला हेच उटणे घराघरात जावे, आणि अभ्यंग स्नानाने गावातील ग्रामस्थांची दिवाळी पहाट आनंददायी व्हावी या उद्देशाने पळसंब गावाच्या विकासाला वाहून घेतलेल्या श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ या संस्थेने उटणे घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची सुरुवात श्री जयंती देवी मंदिरातून करण्यात आली. त्यावेळी
अध्यक्ष- उल्हास सावंत, उपाध्यक्ष- अमरेश पुजारे,
सचिव- चंद्रकांत गोलतकर,
सहसचिव- शेखर पुजारे,
खजिनदार- वैभव परब,
सदस्य- अमित पुजारे, संतोष परब, हितेश सावंत, रामचंद्र पुजारे, श्री राजन पुजारे, श्री प्रमोद सावंत, दिवाकर पुजारे, मंगेश सावंत श्री .रामकृष्ण पुजारे, प्रभू लाड , रुपेश पुजारे , सिद्धार्थ परब , प्रसाद पुजारे, अथर्व गोलतकर, वेदांत सावंत, शुभम पुजारे, मंदार सावंत, बंडो पुजारे , मंथन मुणगेकर, राजा पुजारे, सोहम लाड, उपस्थित होते. उटणे घराघरात पोहोचविण्यासाठी श्री हितेश सावंत, अक्षय परब, अथर्व गोलतकर, लक्ष्मण जंगले यांनी मोठे योगदान दिले.