Home स्टोरी जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमानी साजरा.

जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमानी साजरा.

116

मसुरे प्रतिनिधी: 

 

भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे इ.१लीत प्रवेश घेतला.हा दिवस ‘शाळा प्रवेश दिवस ‘ म्हणून जानवली बौद्ध विकास संघटनेने उत्साहात साजरा केला.

यावेळी कास्ट्राईब संघटनेचे महासचिव तथा ओसरगाव नं.१ या प्रशालेचे मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक श्री.किशोर कदम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवडक भाषणे व लेखन असलेले पुस्तक भेट स्वरुपात दिले.

यावेळी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महामानव डॉ.आंबेडकर यांचे विचार संपूर्ण विश्वाला आदर्शदायी आहेत.प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.आपले सारे जीवन दीन-दुबळ्या जनतेसाठी समर्पित केले.अशा महान कर्तुत्वाला आपण सारे वंदन करुया.पुस्तक वाचून आपले व सर्वांचे जीवन समृद्ध बनवूया .आजच्या पिढीने खूप वाचन करायला हवे.बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पुस्तकाला उच्च स्थान दिले.वाचन वसा जपुया व वाढवुया.असे प्रेरणावर्धक मनोगत व्यक्त केले.

आयुनी.मानसी कदम ,आयु.प्रियांशू कदम,आयुनी.अश्विनी कदम यांनी प्रबोधनपर विचार व्यक्त केले.आयुनी.प्रियांका कदम यांनी ‘भीम माझा लई शिकला’हे गीत सादर केले.यावेळी आयु.किशोर कदम यांनी प्रदान केलेल्या पुस्तकातील काही भाग वाचण्यात आला.

या कार्यक्रमाला दिपक कदम, (अध्यक्ष)संदेश कदम (उपाध्यक्ष) अशोक कदम,संतोष कदम,अनिल कदम,पूजा कदम,संयुक्ता तांबे,कार्तिकी कदम,सायली कदम,सलोनी कदम व बालवर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.संदीप कदम यांनी केले.