Home स्टोरी निराधार ६५ वर्षीय गणेश देसाई  यांना संविता आश्रम चा आधार….

निराधार ६५ वर्षीय गणेश देसाई  यांना संविता आश्रम चा आधार….

325

७ नोव्हेंबर वार्ता: दिवसेंदिवस निराधार वृद्ध, निराधार मुलं आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि हे लोकं गावात तसेच शहरात ठिकठिकाणी अति वाईट परिस्थितीत फिरतांना दिसतात. समाजातील कित्येक लोक यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र यालाच अपवाद ठरत आहेत ते संविता आश्रम चे पदाधिकारी.

गोवा, महाराष्ट्र, विशेष करून सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई या ठिकाणी असे कोणी निराधार व्यक्ती फिरतांना दिसले किंवा आजारी अवस्थेत दिसले असता या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना समजतात हे पदाधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोचवून त्या व्यक्तींना आश्रमात घेऊन येऊन त्यांच्यावर सर्व प्रकारे योग्य ते उपचार करतात.

आज मुंबई पार्ले (प) येथे ५६ वर्षे वयाचे गणेश देसाई  हे व्यक्ती डाव्या पायाला जखमा झालेल्या अवस्थेत फूटपाथवर कित्येक दिवस राहत होते. गणेश देसाई यांच्या डाव्या पायाला जखम झालेली असून त्या जखमेत किडे पडले होते. त्यामुळे गणेश देसाई अति वाईट परिस्थिती ला सामोरे जात फुटफाथवर राहत होते. याबाबत संविता आश्रमच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच संदिप परब आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर गणेश देसाई यांच्या योग्य ते उपचार केले. त्यांच्या पायाच्या जखमेतील किडे काढले आणि त्यांना जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर शेल्टर मध्ये दाखल केले.

निराधार गणेश देसाई यांच्यावर उपचार करतांना संविता आश्रम चे पदाधिकारी संदिप परब

ह्या कामी कोकण कट्टा चे संस्थापक व संविता आश्रम संस्थेचे हितचिंतक मान. अजीत पितळे तसेच सहकारी संपदा सुर्वे, रुपेश गावडे व रत्ना लांघी व पोलीस यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.