Home स्टोरी दूहेरी खूनातील आरोपीला जामीन मंजुर!

दूहेरी खूनातील आरोपीला जामीन मंजुर!

128

सिंधुदुर्ग: आरोपी विनायक उर्फ कुशल नागेश टंगसाळी यास मे. जिल्हा न्यायालयाने रक्कम रुपये 50,000/- हजार चा जामीन मंजुर करुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे. सदरकामी आरोपी यांच्यावतीने अॅड स्वप्नील बबन कोलगांवकर व अॅड. संकेत अभय नेवगी यांनी काम पाहीले.

वस्तुस्थिती अशी की, दिनांक 30/10/2021 रोजी ते 31/10/2021 रोजी सकाळी 8.30 वा चे मुदतीत मौजे उभाबाजार सावंतवाडी घर नं. 378 चे किचनमध्ये मयत निलीमा नारायण खानविलकर व मयत शालीनी शांताराम सावंत यांचे गळयावर वार करुन त्यांना जीवे ठार मारले अशी फिर्याद राजु मसुरकर यांनी पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुध्द दिली होती. व त्यानंतर सदर गुन्हाचा तपास काम सावंतवाडी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आला. पंरतु सदर गुन्हातील आरोपी यांला दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोपी विनायक टंगसाळी मयत महीला निलिमा नारायण खानविलकर हिच्या गळयातील सोन्याची चैन चोरुन घेवुन गेला व त्याकरिता दोन्ही महीलांचा खुन केला यावरुन केवळ संशयावरुन अटक करण्यात आलेली होती. दरम्यानच्या कालवधीत त्यापुर्वी विनायक टंगसाळी यांचकडुन त्याचे चप्पल व कपडे त्याच्यावर संशय घेवुन जप्त करण्यात आलेले होते. या प्रकरणात विनायक टंगसाळी याला आपल्याला सदर प्रकरणात गोवण्याचाच प्रयत्न केला जात असल्याने विनायक हा मुंबई येथ नोकरीकरतिा निघुन गेला होतो. विनायक हा नजरेआड झाल्याने सदर प्रकरणी विनायक टंगसाळी यांच्या संशय घेवुन पोलीसांनी विनायक यांस अटक मंुबई येथे अटक करुन सांवतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते व दरम्यान कालावधीत न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तपासकामी पोलीसांच्या मागणीवरुन एक दिवसाची पोलीस कोठडी देवुन परत न्यायालयीन कोठडी न्यायालयाने दिलेली होती. त्यांनतर आजमितीपर्यत आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता.

सदर प्रकरणी आरोपी तर्फे विधीज्ञ अॅड स्वप्नील बबन कोलगांवकर व अॅड. संकेत अभय नेवगी यांनी मे. न्यायालयात आरोपी यास जामीन मंजुर व्हावा याकरिता जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला असता. सदर प्रकरणी आरोपीच्यावतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील बबन कोलगांवर यांनी दोषारोप पत्रामध्ये जो पुरावा आरोपी गोळा करण्यात आलेला आहे तो कश्याप्रकारे लागु होत नाही  व आरोपी यांस कशाप्रकारे सदरच्या गुन्हात गोवण्यात आलेले आहे ही बाब मे. न्यायालयात युक्तीवादा दरम्यान मांडण्यात आली.

तसेच केवळ आरोपी यांचे चप्पल जप्त करुन त्यांचे ठसे त्याठिकाणी मिळुन येतात व त्यावरून पुढील तपासकाम करुन आरोपी यांस ताब्यात घेण्यात येते तब्बल पंधरा दिवसांनतर ही बाब मुळातच संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपी यांच्या विरुध्द कोणताच ठोस पुरावा आजमितीपर्यत सदरच्या दोषारोप पत्रावरुन दिसुन येत नाही. तसेच सदर गुन्हाशी आरोपीचा काहीही संबध नाही. व आरोपीला खोटया केसमध्ये अडकविलेले आहे. असे प्रथमदर्शनी दिसुन येते असा युक्तीवाद केला. सदरकामी मे. कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरुन आरोपी यांची मे. जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्तता केलेली आहे.