Home स्टोरी गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या जबालिया शरणार्थी छावणीवर इस्रायलयाचा हल्ला

गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या जबालिया शरणार्थी छावणीवर इस्रायलयाचा हल्ला

147

देश विदेश:  गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या जबालिया शरणार्थी छावणीवर इस्रायलने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १९५ हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले, तर ७७७ जण घायाळ झाले आहेत. तसेच १२० जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत, असा दावा हमासने केला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, या आक्रमणात हमासचे २ कमांडर ठार झाले आहेत. या छावणीमध्ये हमासचे आतंकवादी लपून बसले होते. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार अधिकार्‍यांनी म्हटले की, शरणार्थी तळावरील आक्रमण युद्ध गुन्हा होऊ शकतो.

 

 

गाझा पट्टीतून ३२० विदेशी नागरिकांसह ५०० लोकांनी इजिप्तमध्ये प्रवेश केला आहे. यात गंभीररित्या घायळ झालेल्यांचाही समावेश आहे. तसेच विदेशी नागरिकांमध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, चेक गणराज्य, फिनलँड, इंडोनेशिया, इटली, जपान, जॉर्डन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचे नागरिक आहेत.