मसुरे प्रतिनिधी:
देवगड तालुक्यातील मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनिता परमानंद महाजन (८६ वर्ष) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
मुणगे ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक प्रणय महाजन तसेच सारस्वत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किशोर महाजन यांच्या त्या आई होत.