Home Uncategorized मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा दिनांक ०३ मार्च २०२३ रोजी मेळावा…

मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा दिनांक ०३ मार्च २०२३ रोजी मेळावा…

83

मालवण : मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा शुक्रवार दिनांक ०३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी मालवण भाजप कार्यालय येथे दिली.यावेळी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकित वराडकर, सरचिटणीस राकेश सावंत, निषय पालेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, आदींची उपस्थिती असणार आहे. तरी या मेळाव्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ललित चव्हाण यांनी केले आहे.