Home Uncategorized प्रा.सुषमा मांजरेकर यांचा मराठी गौरव दिनानिमित्त सत्कार…

प्रा.सुषमा मांजरेकर यांचा मराठी गौरव दिनानिमित्त सत्कार…

77

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ व दिपक भाई केसरकर मित्रमंडळातर्फे मराठी भाषा समृद्धीसाठी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल व मराठी अध्यापक संघाच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त विशाखा पालव, अनिल गोवेकर, विकास गोवेकर, प्रविना वालावलकर आदी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मराठी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष वि. ना. लांडगे. कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक भरत गावडे, बांदा कॉलेज प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर, वाय.पी.नाईक, माजी मुख्याध्यापक प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.