Home स्टोरी मसुरे येथे आज २०-२० डबल भजन बारी..

मसुरे येथे आज २०-२० डबल भजन बारी..

183

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ यांच्या वतीने साई मंदिर मसुरे येथे साई पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आज दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन नामवंत विनोद विर भजन सम्राटांची ट्वेंटी-ट्वेंटी आमने सामने डबल भजन बारी आयोजित केली आहे.

स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी बुवा श्री संतोष कानडे, मृदुंग योगेश सामंत, तबला विकास देवळे विरुद्ध डुंगो कमाला प्रसादिक भजन शेलपि, बुवा श्री दिनेश वागदेकर, मृदुंगमणी सचिन राणे, तबला अजित मार्गी या भजनीबुवांमध्ये होणार आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन साईकृपा मित्र मंडळ मसूरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.