Home स्टोरी नारायण कुंभार मित्र मंडळ आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

नारायण कुंभार मित्र मंडळ आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

279

वेंगुर्ला: आज रविवार २२ ऑक्टोबर रोजी नारायण कुंभार मित्र मंडळाच्या वतीने शारदा विद्यालय तुळस येथे सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली गणेश पूजन व दीप प्रज्वलन करून केले.

नेत्र तपासणी शिबिराला माजी आमदार राजन तेली यांची प्रमुख उपस्थित
मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करतांना नारायण कुंभार

यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती निलेश सामंत, युवा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटकर, प्रणव वायगणकर, मनोज तांडेल, प्रसाद नाईक, जयवंत तुळसकर ग्रामपंचायत सदस्य तुळस, नारायण कोचरेकर, रमाकांत ठुबरे, स्वाती सावंत मॅडम, गावडे मॅडम, सुजाता पडवळ, शिवाजी तांडेल, सुभेदार मॅडम सुप्रिया ठुबरे, नेहा राणे उपस्थित होते.

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, होडावाडा, तळवडे आणि इतर गावातील तब्बल १२०  जणांची मोफत नेत्र तपासणी यावेळी करण्यात आली. या प्राथमिक तपासणी शिबीरा मधून १५ व्यक्तींना मोतीबिंदू असल्याचे अढळले. या १५ व्यक्तींना मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींना लवकरच मोफत प्रवास सेवाद्वारे ओरस रुग्णालयात नेऊन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबीर उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होण्यासाठी नारायण कुंभार मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात सामान्य कुटुंबात जन्मलेला नारायण कुंभार हा तरुण, तडफदार सामाजिक कार्यकर्ता समाजातील गरजू, गरिब व्यक्तींना योग्य ती मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. गरजू व्यक्तींच्या समस्या जाणून घेणं, गरजू व्यक्तींना सणासुदीला मोफत साहित्य वाटप,  गरजू व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो. यामुळेच २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नारायण कुंभार ४०० हुन अधिक मतांनी निवडून आले. यापूर्वीही नारायण कुंभार यांनी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हि अनेक लोकांनी सहभाग घेतला होता.  या शिबिरात तब्बल २५  मोतीबिंदूचे रुग्ण मिळाले होते. सर्व रुग्णांना नारायण मित्र मंडळाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिली आणि सर्व रुग्णांना हे सुंदर जग बघण्यासाठी नवी दृष्टी दिली.