Home स्टोरी श्री देवी काळकाई देवस्थान उपसमिती कारिवडे ची नवीन उपसमिती

श्री देवी काळकाई देवस्थान उपसमिती कारिवडे ची नवीन उपसमिती

205

सावंतवाडी: तालुक्यातील श्री देवी काळकाई देवस्थान उपसमिती कारिवडे या मंदिराच्या समितीची मुदत संपल्यामुळे नवीन उपसमितीची निवड दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कारिवडे यांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांनी नवीन श्री देवी काळकाई देवस्थान उपसमिती निवड करण्याविषयी सूचना केल्या होत्या यावेळी या ग्रामसभेस एकूण १११ सदस्य उपस्थित होते. हि सभा सरपंच सौ. आरती माळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या नियमावलीचे वाचन केले. त्यानुसार खालील उपसमितीची निवड करण्यात आली.

अध्यक्ष श्री – बाबाजी बाबू गावकर
खजिनदार – बोंबडे बाळकृष्ण गावकर
सचिव – दत्ताराम विष्णू गावडे

 

अध्यक्ष श्री – बाबाजी बाबू गावकर, खजिनदार – बोंबडे बाळकृष्ण गावकर, सचिव – दत्ताराम विष्णू गावडे,  सदस्य – मनोहर सावळाराम वासकर , अल्बा खेमा घाडी, लाडू साबा जाधव, अनिल वामन नाईक, शंकर विनायक मेस्त्री, कृष्णा हरिचंद्र परब, कृष्ण बाबुराव परब, विलास कृष्णा गवळी, रवींद्र ठाकूर, शंभा खडपकर,  सोनू सावंत शरद परब, वरील सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सचिव श्री दत्ताराम गावडे यांनी मागील पाच वर्षे ज्या प्रमाणे सर्वानी सहकार्य केले याविषयी आभार व्यक्त केले आणि पुढील कार्यकाळात असेच सहकार्य करावी अशी सर्वाना विनंती केली , श्री देवी काळकाई देवस्थान उपसमिती कारिवडे हि समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांचा मार्गदर्शनाने पुढील कार्य करणार आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी समितीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.