Home स्टोरी मराठा समाजाला दाखले द्या ; मराठा समाजाचे देवगड तहसीलदारांना निवेदन…..

मराठा समाजाला दाखले द्या ; मराठा समाजाचे देवगड तहसीलदारांना निवेदन…..

146

देवगड प्रतिनिधी:

 

देवगड तालुक्यातील मराठा समाजासाठी मराठा उल्लेख असलेले दाखले मिळावेत असे निवेदन आज देवगड तालुका मराठा समाजातर्फे तहसीलदार यांना देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की,

देवगड तालुक्यातील मराठा समाजातील अनेक युवक उद्योग व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या अनेक योजनांतर्गत बँकेमधून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु देवगड तालुक्यातील अनेक मराठा युवकांकडे मराठा समाजाचे दाखले तसेच शाळेच्या दाखल्यावर ‘मराठा’ असा उल्लेख नसल्याने त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. मराठा आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने अद्याप रद्दपातन केलेला नाही. मराठा समाजाचे दाखले हे ‘सारथी’ संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये तसेच ‘EWS ‘ दाखला मिळवणेसाठी लागतात. तरी मराठा समाजाचे जातीचे दाखले मिळण्यासाठीचे अर्ज आपल्याकडून स्वीकारण्यात यावे ही नम्र विनंती.

यावेळी संदीप साटम, बंटी कदम, किसन सूर्यवंशी, प्रवीण वातकर, संजीव राऊत, दयानंद पाटील, शेखर सावंत, केदार सावंत, सुधीर तांबे,नंदू देसाई, प्रकाश सावंत, सचिन मोहिते, प्रदीप सावंत, विष्णू सावंत, मनोज सावंत, गजेंद्र सावंत, बबन सावंत, पंकज दुखंडे, निलेश सावंत, गोविंद घाडी, राजू भुजबळ तसेच मराठा बांधव उपस्थित होते.