Home Uncategorized सावंतवाडी शहराला आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार….

सावंतवाडी शहराला आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार….

51

“फिल्टर प्लान्ट” वरील वाळू बदलली; लवकरच नरेंद्र डोंगरावरील टाकीचेही काम करणार…

सावंतवाडी: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावर फील्टर प्लान्टवरील वाळू अखेर बदलण्यात आली आहे. गेले चार दिवस रात्रंदिवस काम करून हे काम पुर्ण करण्यात आले आहे. यासाठी साडे नऊ लाखाचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला आता स्वच्छ पाणी मिळणार आहे, असा दावा पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भाऊ भिसे यांनी केला. दरम्यान हे काम पुर्ण झाल्यांनतर आता नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या फिल्टर प्लान्टचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी साडे तीन लाखाचा खर्च अपेक्षीत आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणातील वाळू खराब झाली होती. त्यामुळे शहरातील लोकांना गढूळ पाणी मिळत होते. त्यामुळे ही वाळू बदलण्य यावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत होती. त्यानुसार हे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेली वाळू ही गुजरात- गोध्रा येथून आणण्यात आली आहे. तसेच पाणी शुध्द मिळावे यासाठी पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचे थर टाकून हे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत श्री. भिसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सन २००० सालामध्ये ही वाळू बदलण्यात आली होती. त्यानंतर आता वीस वर्षानी काम करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरीकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. येत्या काही दिवसात येथिल नरेद्र डोंगर परिसरात असलेल्या टाकीवरील असलेल्या फिल्टर प्लान्ट मधील वाळू बदलण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.