Home स्टोरी सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. मुरली मनोहर चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्या-...

सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. मुरली मनोहर चव्हाण यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्या- शहरवासीयांनसहित अनेक सेवाभावी संघटनांची मागणी

163

सावंतवाडी प्रतिनिधी: डॉ. मुरलीमनोहर चव्हाण हे २०११-१२ मध्ये सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज मधून बीए. एम. एस. हि पदवी घेऊन २०१५ पासून आजपर्यंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये निस्वार्थ व निशुल्कपणे रुग्णांची सेवा करत आहेत. शेवटी प्रत्येकाच्या पोटा पाण्याच्या प्रश्न येतोच याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळामध्ये डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांचं खूप मोठं योगदान आहे. कोरोना काळामध्ये जीवाची परवा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या या उत्कृष्ट सेवाभावी कामगिरीबद्दल कोविड योद्धा म्हणून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

कोरोना काळात उत्कृष्ट सेवाभावी कामगिरीबद्दल कोविड योद्धा म्हणून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याकडू डॉ. मुरलीमनोहर चव्हाण सन्मानित

 

सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. चितारी यांच्या हाताखाली त्यांनी बरीच वर्षे प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे पेशंटला योग्य पद्धतीने हाताळण्याचं ज्ञान आहे. त्यांच्या बाबतीत एक घडलेला किस्सा असा की, विमान प्रवासामध्ये मुंबई एअरपोर्टवर एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता. त्या व्यक्तीची पस देखील भेटत नव्हती. थोडक्यात ती व्यक्ती मृत्यूच्या दारातच होती. अशावेळी डॉ. मुरली चव्हाण यांनी तत्काळ प्राथमिक उपचार करून त्या व्यक्तीला जीवदान दिले होते. असे बरेच पेशंट त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. चितारी यांच्या मार्गदर्शनाखाली बरे केले व अजूनही निस्वार्थपणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते रुग्णांना सेवा देताना दिसतात.

रात्री बे रात्री कधी पण कॉल आल्यानंतर ते तत्काळ सामाजिक कार्य किंवा रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू होतात तसेच इमर्जन्सी च्या वेळी २४ तास रुग्णांना सेवाहि देतात. काही दिवसापूर्वी सावंतवाडी मध्ये झाड पडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्या युवकांना वाचविण्याचे शर्यतीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या अशा या तत्परसेवेमूळे शहरातील सामाजिक संघटना नेहमीच त्यांच कौतुक करत असतात. सावंतवाडी शहरांमध्ये त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. सावंतवाडी शहरातील रक्तदाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी हे त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. देव्या सूर्याजी त्यांना नेहमीच सहकार्य करत असतात. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर डॉ. मुरली यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन बनावे म्हणून त्यांना सेवेत कायम रुजू होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभते.

तसेच मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष तरबेज बेग, मोशिन मुल्ला, सोहाब बेग हे देखील त्यांना वेळोवेळी चांगले सहकार्य करत असतात. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व युवा रक्तदाता संघटना यांच्यासोबत देखील ते अनेकदा सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात.असा समाजसेवेचा भान असणारा देवदूत सारखा डॉ. मुरली चव्हाण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमचा लाभावा जेणेकरून शहरांमध्ये समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्यांची साथ मिळू शकेल व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. म्हणून अशा प्रकारचे डॉक्टर हातातून निसटू नयेत याकरिता सावंतवाडी शहरातील नागरिकांसहित विविध संघटनांकडे मागणी केली आहे. त्यासाठी या विषयासंदर्भात शहरातील अनेक सेवाभावी संघटनांमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव यांनी दिली.