कणकवली: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी आज कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक,मुलगा राजवर्धन नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उत्तम लोके, गणेश गावकर आदी उपस्थित होते.







