Home क्राईम सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील...

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील निलंबित…

456

सावंतवाडी: बांधकाम व्यवसायिक सिद्धांत परब एक लाख रुपयांची लाच घेतांना सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांना रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने गुरवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रंगेहात ताब्यात घेतले होते व लाच स्वीकारल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे व उपनिरिक्षक सुरज पाटील या दोघांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र उपनिरिक्षक सुरज पाटील यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने ते सावंतवाडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अद्याप पर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तर पोलिस कोठडीत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यापुर्वी उपनिरिक्षक सुरज पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.