Home स्टोरी इस्रायल-हमास युद्ध रशिया रोखू शकतो! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा….

इस्रायल-हमास युद्ध रशिया रोखू शकतो! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा….

103

देश विदेश: हमासने इस्रायलवर क्रूरपणे हल्ले केले पण आता इस्रायलकडून होत असलेले हल्लेही क्रूरच असल्याचे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलं आहे. त्यासोबत इस्रायल-हमास युद्ध रशिया रोखू शकतो असा दावा देखील पुतीन यांनी केला आहे. पुतीन म्हणाले,”गाझावरील हल्ल्यांबाबत अमेरिकेत चर्चा सुरू आहे, गाझाला वेढा घालण्याची चर्चा आहे. “दुसऱ्या महायुद्धात लेनिनग्राडला वेढा घातला होता त्याप्रमाणे इस्रायलगाझा वेढा घालत आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले.

 

पुढे बोलताना त्यांनी, “माझ्या दृष्टिकोनातून, हे अस्वीकार्य आहे. तेथे (गाझा) २० लाखाहून अधिक लोक राहतात. हे सर्व लोक हमासचे समर्थन करत नाहीत, परंतु महिला आणि मुलांसह सर्वांनाच याचा त्रास होईल.” गाझा भागातील लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ते म्हणाले, साहजिकच हे कोणालाही मान्य करणे सोपे नाही. पुतीन यांनी इस्त्रायल-गाझामधील अलीकडचे संकट चर्चेद्वारे सोडविण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंशी संबंध असल्याने रशिया मदत करू शकते, असेही ते म्हणाले.