Home स्टोरी नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली...

नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी.

302

नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना….

 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील नारुर क नारुर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचे, बागायतींचे नुकसान झाले. त्याचबरोबर सरनोबतवाडी येथील साकव देखील कोसळला आहे. याठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी तात्काळ भेट देत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली. कोसळलेल्या साकवाच्या ठिकाणी देखील नवीन साकव उभारण्याबरोबरच तातडीची उपाययोजना करण्यास सांगितले.

नुकसान झालेल्या शेती बागायतीची पाहणी करतांना आमदार वैभव नाईक

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नारुर क नारुर सरपंच वैष्णवी मेस्त्री, उपसरपंच मुकुंद सरनोबत, तलाठी नंदकिशोर परब, कृषी सहाय्यक धनंजय कदम, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, वेताळबांबर्डे उपसरपंच प्रदीप गावडे, संजय आचरेकर, शिवाजी कदम, आबा तळेकर, शंकर सुद्रिक आदींसह नारुर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.