पुणे: पुणे शहर युवक व क्रीडा सेलच्या कार्यकरणीच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस भवन येथे युवक व क्रीडा सेलचे प्रदेशाध्यक्ष समीता गोरे यांच्या मान्यतेने सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. पुणे शहर युवक व क्रीडा सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रथमेश रोहित लभडे यांची यांची निवड कारण्यात आली आहे. तसेच पुणे शहर सरचिटणीसपदी वैष्णवी गोविंद धुमाळ, पुणे शहर सरचिटणीसपदी साक्षी शेलार यांची पुणे शहर, वेदांग देवीदास ठाकर यांची पुणे शहर जिल्हा संघटक, सुभाष पगारे यांची शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष, जुबेर शेख यांची खडकी ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे आणि माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी युवक व क्रीडा सेलचे शहराध्यक्ष आशुतोष शिंदे हे उपस्थित होते.