Home स्टोरी नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी! पोलीस...

नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी! पोलीस निरीक्षक अरुण पवार

93

दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील नवरात्रौत्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्यावर देखील तेवढाच भर द्यावा. नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे. नवरात्रौत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. येथील पोलीस ठाण्यात श्री. पवार यांनी दोडामार्ग शहरातील तसेच तालुक्यातील अन्य गावांमधील सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. यंदाच्या गणेशत्सवात बाजारपेठेसोबत संपूर्ण शहर परिसरात वाहतुकीचे चोख नियोजन केल्याबद्दल श्री. पवार यांचे बैठकीच्या सुरुवातीला दोडामार्ग शहरातील गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष अजित चांदेकर, सचिव नितीन मणेरीकर, आनंद कामत यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

 

दरम्यान बैठकीत श्री. पवार म्हणाले की, नवरात्रौत्सव मंडळांनी नवरात्रोत्सव साजरा करताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाऊडस्पिकरच्या व अन्य सर्व परवानग्या पोलीस प्रशासनाकडून घ्याव्यात शिवाय पोलीस ठाण्यात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करून पोलीस तसेच अन्य प्रशासनाला सहकार्य करावे. नवरात्रौत्सव शांततेत व सालोख्यात साजरा करण्याबाबत धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श आपल्या मंडळांचा निर्माण करावा. दुर्गा मातेच्या ठिकाणी स्वच्छता तसेच स्वयंसेवक नेमणे, महाप्रसादावेळी योग्य ती काळजी घेणे आदींकडे श्री. पवार यांनी लक्ष वेधले.