Home स्टोरी सावंतवाडी पोलिसांचा “एक तारीख’ एक तास स्वच्छता” अभियानात सहभाग….

सावंतवाडी पोलिसांचा “एक तारीख’ एक तास स्वच्छता” अभियानात सहभाग….

178

सावंतवाडी: स्वच्छ भारत अभियानअंतर्गत (Swachh Bharat Mission) देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज सकाळी “एक तारीख’ एक तास स्वच्छता” मोहीम राबविण्यात आली. सावंतवाडी पोलिसांनी देखील आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. सावंतवाडी पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आज रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस लाईन येथे एस. पी. के. कॉलेज एनसीसी आर्मी आणि नेव्ही विंग चे एकूण पन्नास विद्यार्थी, दोन शिक्षक, श्री. सचिन आर्मी विंग आणि श्री. अर्फाज सर नेव्ही विंग, पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले, खंडागळे पोलीस निरीक्षक श्री अमित गोते, आनंद यशवंते, सरदार पाटील, सूरज पाटील, गजानन भालेराव यांसोबत पोलीस हवालदार राऊत, वांलावलकर, जाधव, सहाय्यक फौजदार देसाई, महिला पोलीस अंमलदार धनुजा ठाकूर, पूजा जाधव, शर्मिला गवस, महिला पोलिस नाईक चैताली देसाई, शिल्पा केदार, महिला पोलीस हवालदार सावंत, दुधवडकर, साक्षी कोपकर,  होम गार्ड भांडये, वेंगुर्लेकर असे एकत्र आले.

शासनाच्या स्वच्छता सेवा उपक्रमांतर्गत सकाळी १०:०० ते १२:०० वाजेपर्यंत पोलीस ठाणे, पोलीस लाईन परिसर प्लास्टिक मुक्त केला. पोलीस ठाणे कडे येणाऱ्या रस्त्याच्या वरील खड्डे बुजवले, परिसरातील अनावश्यक ठिकाणी गवत कचऱ्याची विल्हेवाट लावली आणि स्वच्छता मोहीम राबवली.

एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस ठाणे सावंतवाडी येथील हॉलमध्ये एकात्मतेचे, स्वच्छतेचे, शिस्तीचे महत्व सांगून करिअरदृष्ट्या मार्गदर्शन केले. यावेळी आलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी अंमलदार यांना चहा नाश्ता दिला. एनसीसी विद्यार्थ्यांचे हम सब भारतीय है या एकात्मतेच्या गाण्याने स्वच्छता उपक्रम कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

पोलीस ठाणे चे अधिकारी पोलीस उपनिरिक्षक श्री. अमित गोते यांनी ज्येष्ठ नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या.सर्व कार्यक्रम पोलीस निरीक्ष ऋषिकेश अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.