Home स्टोरी “एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास”  या उपक्रमाला तुळस गावात उत्स्फूर्त...

“एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास”  या उपक्रमाला तुळस गावात उत्स्फूर्त प्रतिसाद….

178

वेंगुर्ला: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली. तसेच “एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास” हा उपक्रम गावो गावी रबवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावा गावात आणि शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात सर्व ग्रामस्थांनी मिळून आज “एक तारीख, एक तास, महाराष्ट्र बनवूया खास”  हा उपक्रम हाती घेत गावातील ग्रामपंचायत परिसर, जैतीर मंदिर,जिल्हा परिषद शाळा, मेन रोड येथे साफसफाई केली. तसेच नदी, नाले, गटारे साफ केले.

यावेळी ग्रामपंचायत तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रामसेवक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, जयवंत तुळसकर, रमाकांत ठूबरे, रतन कबरे, स्वाती सावंत, गावडे, गावातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.