Home स्टोरी सुनिल गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सुनिल गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

246

मुंबई: शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी वरळी मुंबई येथील डाँ. आंबेडकर भवन ट्रस्ट च्या वतीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सचिन भाऊ अहिर आणि महिला व बालकल्याण विभागाचे सह आयुक्त  मोरे यांच्या शुभहस्ते शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षक सुनिल हरी गायकवाड, प्रशिक्षित शिक्षक चेंबूर कॅम्प मनपा उ. प्रा. इंग्रजी शाळा चेंबूर, मुंबई यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुनिल हरी गायकवाड हे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री. सतिश चव्हाण व वरळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

सुनिल गायकवाड हे सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा (दिगर) येथील रहवासी आहेत. सध्या ते मुंबईनगरी येथे प्रशिक्षित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  दिवसेंदिवस करत असलेल्या विविध शैक्षणिक कार्यासाठी सुनिल गायकवाड यांना मित्रपरिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.