Home स्टोरी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे साधला तरुणांशी संवाद.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे साधला तरुणांशी संवाद.

129

२४ सप्टेंबर वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरवण्यापासून ते G20 चे यश तसेच भारतीय तरुणांसाठी एक उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.आज ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०५ वा भाग होता. G20 च्या प्रचंड यशानंतर हा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून कशाप्रकारे संदेश मिळत आहेत, याबाबत पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मला पुन्हा एकदा माझ्या देशाचे आणि देशवासीयांचे यश शेअर करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत, मला चांद्रयान-3 चे लँडिंग आणि दिल्लीतील G20 च्या यशाबाबत अनेक संदेश आले आहेत.’ ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकातून मला अनेक संदेश मिळाले आहेत. चांद्रयान-३ चे लँडिंग कोट्यवधी लोकांनी पाहिले. इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण घटना 80 लाख लोकांनी पाहिली. हा स्वतःच एक विक्रम आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमात सांगितले की, चांद्रयान-3 च्या यशावरून या मोहिमेवर लोकांचे किती प्रेम आहे हे दिसून येते. या मोहिमेच्या यशानंतर देशात एक स्पर्धाही सुरू आहे, तिचे नाव आहे ‘चांद्रयान-3 महाक्विझ’. या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी लोकांना या महाक्विझमध्ये सहभागी होण्याची विनंती केली, कारण ती संपायला अजून सहा दिवस बाकी आहेत.

चांद्रयान-3 च्या यशानंतर जी-20 ला ज्या प्रकारे यश मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित झाला आहे. भारत मंडपम एखाद्या सेलिब्रिटीसारखा झाला आहे. ते म्हणाले की, आफ्रिकन युनियनला G20 चा सदस्य बनवून भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे. आफ्रिकन युनियन हा 51 आफ्रिकन देशांचा समूह आहे, ज्यांना नवी दिल्ली येथे झालेल्या G20 मध्ये या गटाचे सदस्य बनवण्यात आले होते.असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.