२४ सप्टेंबर वार्ता: खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. असं असतांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. NIA ने पंजाबमधील विविध शहरात असलेल्या ‘शीख फॉर जस्टिस‘ या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याची संपत्ती जप्त केली असून १९ दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर केली आहे. हे सर्व दहशतवादी फरार असून या सर्वांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
NIA ने काही दिवसांपूर्वी ४३ फरारी आरोपींची यादी जाहीर केली होती. NIA कडून जाहीर झालेल्या या यादीतील नावे भारतात मोस्ट वॉन्टेड असून त्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. या सर्व फरार खलिस्तानींच्या भारतातील मालमत्ता UAPA च्या कलम ३३ (५) अंतर्गत जप्त केल्या जाणार आहेत. हे खलिस्तानी परदेशात राहून भारतविरोधी प्रचार करत असतात. तसेच भारतविरोधी कारवायात सामील असतात.
NIA ने जाहीर केलेली खलिस्तानी दहशतवादी यादी खालीलप्रमाणे:
1.परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन
2.वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान
3.कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन
4. जेएस धालीवाल- अमेरिका
5.सुखपाल सिंग- ब्रिटन
6.हरप्रीत सिंग उर्फ राणा सिंग- अमेरिका
7.सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन
8.कुलवंत सिंग उर्फ कांता- ब्रिटन
9.हरजाप सिंग उर्फ जप्पी सिंग- अमेरिका
10.रणजित सिंग नीता- पाकिस्तान
11.गुरमीत सिंग उर्फ बग्गा बाबा- कॅनडा
12.गुरप्रीत सिंग उर्फ बागी- ब्रिटन
13.जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई
14.गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया
15. लखबीर सिंग रोडे- कॅनडा
16.अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका
17.जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा
18.दुपिंदर जीत- ब्रिटन
19.एस. हिम्मत सिंग – अमेरिका