Home स्टोरी कलंबिस्त दूध संस्थेत इलेक्ट्रिक वजन काटा शुभारंभ.

कलंबिस्त दूध संस्थेत इलेक्ट्रिक वजन काटा शुभारंभ.

131

ही संस्था निश्चितच गावात धवल क्रांती घडवेल! श्री बिडये….

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचकोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त ही संस्था गावातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करत आहे. या भागात गोशाळा प्रत्येक घराघरात वार्डमध्ये निर्माण होईल असे कार्य ही संस्था करत आहे. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त बँक अधिकारी चंद्रकांत बिडये यांनी शुभेच्छा दिल्या. या दुग्ध संस्थे ला इलेक्ट्रिक वजन काटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गणेश चतुर्थी सण निमित्ताने शेतकऱ्यांना भेट वस्तू प्रधान कार्यक्रम करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बिडये उपस्थित होते.

यावेळी गणेश चतुर्थी सणाच्या पूर्वसंध्येला हरितालिका दिनाच्या शुभ दिनी या संस्थेत इलेक्ट्रिक वजन काटा चा शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत, सचिव रमेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ, संचालक लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे, गजानन राऊळ, सचिन तावडे, किशोरी तावडे, हेमलता सावंत, श्रीमती मेस्त्री, लवु राऊळ, राजन घाडी, राजन राऊळ, माजी उपसरपंच रेश्मा सावंत आधी दुग्ध शेतकरी उपस्थित होते.यावेळी गणेश चतुर्थी सणानिमित्त या दुग्ध शेतकऱ्यांना शिधा भेट देण्यात आला.

यावेळी श्री बिडये पुढे म्हणाले कलंबिस्त गावात पाच वर्षांपूर्वी संस्था सुरू करण्यात आली. ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्परतेने काम करत आहे. या गावातील तरुणांनी या संस्थेच्या माध्यमातून दुग्ध आणि कृषी क्षेत्रात प्रगती करावी आणि गावात गोशाळा च्या माध्यमातून दुग्ध क्रांती उभारावी. निश्चितपणे या संस्थेला कायमस्वरूपी सहकार्य राहील असे त्याने स्पष्ट केले. यावेळी ॲड. सावंत यांनी या संस्थेला अनेकांचे सहकार्य आणि मदत कायमस्वरूपी मिळत आहे. त्यामुळेच ही संस्था पाच वर्षात अनेक चढ उतार अनुभवत गावात धवलक्रांती च्या दृष्टीने कार्य करत आहे. दुग्ध शेतकऱ्यांची लवकरच आरोग्य तपासणी केली जाणार आहे. असे विविध उपक्रम राबवण्यात येतील असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला महेंद्र सांगेलकर, नंदू शिरोडकर आदींचे सहकार्य लाभले. उपस्थितांचे आभार रमेश सावंत यांनी मानले.