Home स्टोरी कोकरनागमध्ये गेल्या ५ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच….

कोकरनागमध्ये गेल्या ५ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच….

182

१७ सप्टेंबर वार्ता: काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या ५ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे जंगलातील टेकड्यांमध्ये भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. रॉकेट लाँचर आणि इतर घातक शस्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. आज  सलग पाचव्या दिवशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई सुरूच आहे

अनंतनागमध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवाईची पोस्ट रिट्वीट करत राजीव चंद्रशेखर यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “भारताचे अनेक शत्रू आहेत. आपल्याला रोखणं एवढंच त्यांचं ध्येय आहे. पण त्यांना माहीत असावं की, भारतीय सैन्याकडे आता हायटेक आणि घातक अद्ययावत हत्यारं आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, भारतीय सैन्याच्या नादी न लागण्यातच शहाणपण असेल. यह न्यू इंडिया है. भारत न डरेगा, न पीछे हटेगा.” तसेच, त्यांनी पुढे लिहिलंय की, भारतानं युद्ध पाहिलं आहे आणि आम्हाला युद्ध नको आहे. परंतु, जर तुम्ही भारताविरोधात युद्ध छेडलं तर मात्र तुमची मुलं अनाथ होतील.