मसुरे प्रतिनिधी:
मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळेमध्ये संपन्न होत असलेले विविध सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेची गरज ओळखून मसुरे देऊळवाडा येथील रहिवासी तथा पदवीधर प्राथमिक शिक्षक श्री. आनंद मानाजी तांबे व श्री. सुगंध मानाजी तांबे यांनी शाळेसाठी ‘साऊंड सिस्टिम’ भेट म्हणून दिली.
देऊळवाडा शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळावी यासाठी ही भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
या देणगी बद्दल देऊळवाडा शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर तसेच सर्व शिक्षक व पालकांनी विशेष आभार मानले.