Home स्टोरी वायंगणी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यावर निलंबनाची कारवाई मागणी!

वायंगणी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यावर निलंबनाची कारवाई मागणी!

190

वेंगुर्ला:  तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी ठेकेदारांची संगनमत करून काढलेल्या नियमबाह्य निविदा प्रकरणी खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच झालेल्या व होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी

 

अशी मागणी वायंगणी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष साळगावकर, भिकाजी गावडे,आत्माराम साळगांवकर,रमेश मेस्त्री,योगेश तांडेल,गणेश जोशी,विशाल मटकर, मनोहर भगत,सुरेश तांडेल,भालचंद्र सातार्डेकर,राजेश घोलेकर,मंगेश पेडणेकर,भिवा भगत, रवींद्र पंडित, अनंत केळजी,रमेश म्हारव,सुनील भोगवेकर आदी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन सादर करून केली आहे

 

निवेदनात म्हटले की, 

वायंगणी गावातील विविध ९ विकास कामांची निविदा जावक क्र ०८ दि.२५ एप्रिल २०२३ ने वायंगणी ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांनी लावली होती. या निविदेमध्ये जनतेची आणि प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या अटी शर्ती घालून ठेकेदारांशी संगनमत करून शासनाच्या लाखो रुपये निधीची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे.

वायंगणी गावामध्ये सध्यस्थितीत सरपंच हे पद अस्तित्वात नसताना सुद्धा निविदेच्या अटी शर्ती मध्ये निविदा मंजूर अथवा ना मंजूर करण्याचे अधिकार मे.सरपंच यांनी राखून ठेवलेले आहेत व त्याबाबत कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही असे नमूद केलेले आहे हे पूर्णतः नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.

या निविदेतील अन्य कामांमध्ये देखील अनेक त्रुटी असून याविषयीं कोणतीही खातरजमा न करता शासनाचे नियम धाब्यावर बसवून प्रशासक व ग्रामसेवक यांनी ठेकेदार यांच्याशी संगनमत करून यानिविदेतील कामे नियमबाह्य पद्धतीने उरकून घेण्याचा सपाटा लावलेला आहे तरी याप्रकरणी सदर निविदेतील सर्व कामांची शासनाच्या नियमानुसार पडताळणी होऊन नियमबाह्य पद्धतीने केल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी होऊन संबंधित प्रशासक व ग्रामसेवक यांचेवर शासनाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे असून देखील सदर निविदेतील कामांना खर्च घालण्याचा प्रयत्न केला गेल्यास या नियमबाह्य निवेदनुसार खर्च झालेल्या व खर्च होणाऱ्या सर्व शासकीय रकमेची वायंगणी ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांचे कडून वसुली करून घेण्यात यावी