Home स्टोरी ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

ठाणे येथे ८ दिवसांत कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण !

182

केवळ ४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार….

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मागील ८ दिवसांत कोरोना महामारीचे नवीन ५१ रुग्ण आढळले आहेत. यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन सतर्क झाले आहे. ‘रुग्ण आढळले असले, तरी यातील केवळ ४ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात भरती असून अन्य रुग्णांवर घरी उपचार चालू आहेत. यामुळे वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता असली, तरी वाढलेल्या आकडेवारीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.