Home स्टोरी कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठक संपन्न!

कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठक संपन्न!

518

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावात दूध संकलन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना दूध संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. जे शेतकरी चांगल्या प्रतीचे दूध संस्थेकडे आणतील त्यांचा सन्मान गौरव केला जाणार आहे. तसेच मांगल्य वासरू संगोपन योजना व शेतकरी वेल्फेअर फंड च्या माध्यमातून शेती शैक्षणिक आरोग्य असे विविध उपक्रम वर्षभरात राबविण्यात येणार आहेत. असा निर्णय कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बैठकीत गावातील एकूण आठ आदर्श दूध शेतकऱ्यांचा विशेष गौरव हे करण्यात आला. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कलंबिस्त दूध केंद्र येथे संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी संस्थेचे रमेश सावंत, लक्ष्मण राऊळ, दत्ताराम कदम, प्रकाश तावडे, अशोक राऊळ, राजन घाडी, लहू राऊळ, कुसाजी सावंत, बाबाजी सावंत, अनंत सावंत, चिंतामणी सावंत, सदानंद महडगुत, आत्माराम तावडे, जानू पास्ते, सुचिता तावडे, शिवप्रसाद राऊळ, शशिकांत सावंत, साधना सावंत, श्रीमती मेस्त्री, स्वप्निल सावंत आणि सिद्धेश सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशी दूध संकलन वाढीच्या दृष्टीने काय करता येईल यावर विचार झाला. जिल्हा बँक गोकुळ विविध योजना तसेच दूध जनावरे म्हैसी गाई खरेदीसाठी योजना राबवत आहे. त्या योजना एक संघपणे राबवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. लवकरच गावातील तरुणांसाठी एक नाविन्यपूर्ण म्हैस गाय संगोपन योजना राबवण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेच्या माध्यमातून जे दूध शेतकरी वर्षभर संस्थेकडे चांगल्या प्रतीचे दूध संकलन करतील त्यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना गाय व म्हशी पासून जर वासरू प्रजात साठी मांगल्य वासरू संगोपन योजना या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. असाही निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. सर्व गावातील दूध शेतकऱ्यांचा शेतकरी विमा व आरोग्य सुदृढ योजना व शैक्षणिक योजना राबविण्यात येणार आहे. दूध शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या जनावरांचीही तपासणी केली जाणार आहे.

शेतकरी वेल्फेअर फंड उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावात दूध शेतकरी यांना अधिक सक्षम करणे व केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा बँकेच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. यावेळी वर्षभरात उत्कृष्ट प्रतीचे दूध संस्थेला देणारे लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे , लवु राऊळ, आत्माराम तावडे, जानू पास्ते, राजन घाडी, रामचंद्र उर्फ गुरु राऊळ, रेश्मा सावंत आदींचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ, लक्ष्मण राऊळ, चिंतामणी सावंत, सदानंद महडगुत, प्रकाश तावडे, सिद्धेश सावंत आदिने विचार मांडले. यावेळी उपस्थितांचे आभार रमेश सावंत यांनी मानले.

फोटो :

कलंबिस्त कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था प्रगतशील दूध शेतकरी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना संस्था अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, बाजूला रमेश सावंत, दत्ताराम कदम, लक्ष्मण राऊळ, अशोक राऊळ, सदानंद म्हडगुत, अनंत सावंत, शशिकांत सावंत, शिवप्रसाद राऊळ, श्रीमती मेस्त्री, किशोरी तावडे, सुचिता तावडे, सौ. सावंत, स्वप्निल सावंत आधी