सध्या राज्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. जेथे ठिकाणी पाऊस सुरु आहे, तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज ८ सप्टेंबर आणि उद्या ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मूळ जागेवर आणि जमिनीपासून दिड किमी उंचीपर्यंतच्या जाडीत असलेला मान्सूनचा आस देशाच्या मध्यावर पूर्व -पश्चिम दिशेत मूळ जागेवर आहे. त्यामुळं पावसाची शक्यता असल्याची माहिती खुळे यांनी दिली.
पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार सुरुवात केली आहे. सखल भागात पाणा साचायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे.