Home क्राईम देशी गोवंशाची अवैध तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात!

देशी गोवंशाची अवैध तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात!

191

संगमेश्वर: तालुक्यातील देवरुखजवळील हातीव येथे देशी गोवंशाची अवैध तस्करी करणाऱ्या वाहनांची माहिती मिळताच गोराक्षांकाकडून ‘हॉटेल गिरीराज’जवळ पहिली गाडी अडवली. याचा सुगावा लागताच दुसऱ्या गाडीने मार्ग बदलला. मात्र अत्यंत चलाखीने दुसऱ्या गाडीला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. या समयसूचकतेबद्दल पोलिसांनी सर्व गोरक्षकांचे आभार मानले २ गाड्यांमध्ये जवळपास १५ गाईगुरे आणि काही वासरे अक्षरशः कोंबून बसवण्यात आल्याचे चित्र पाहून उपस्थितांनी संताप व्यक्त केला. तसेच लवकरात लवकर या गुरांची योग्य व्यवस्था करण्याची पोलिसांना विनंती केली. गाड्या शाहूवाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

 

यावेळी गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेत अजूनही हिंदूंच्या चेतना संपल्या नसल्याचा उद्घोष केला. हिंदू धर्मात गायीला दैवत समजले जाते. अशा देशी गायींना कत्तलीपासून वाचवण्यासाठी देशभर मोहीम चालवली जाते. आज अशी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या, मार्लेश्वरसारखे पुण्यक्षेत्र असलेल्या संगमेश्वर तालुक्यात उघडकीस येते हे अत्यंत धक्कादायक आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या. यानंतर “हिंदूंच्या आस्थांचा जर कोणी अनादर करताना दिसले तर खपवून घेतले जाणार नाही. याबाबत पोलीस कारवाई करतीलच पण गोरक्षकही आपला इंगा दाखवतील” असा सूचक इशारा कार्यकर्त्यांनी दिला.