Home स्टोरी देऊळवाडा शाळेतील पाककृती स्पर्धेत आदिती अमोल मेस्त्री प्रथम. 

देऊळवाडा शाळेतील पाककृती स्पर्धेत आदिती अमोल मेस्त्री प्रथम. 

250

 

 

मसुरे प्रतिनिधी 

प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा शाळेतील पाककृती स्पर्धेत आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “नाचणीचे आप्पे” या पाकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये देऊळवाडा शाळेतील पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा वापर करुन शेवया, मोदक, लाडू, करंज्या, पुरी, असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी केली होती.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुप्रिया मेस्त्री, तृतीय क्रमांक प्रगती परब यांनी पटकावला.

केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे परीक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरेच्या डॉ. वीणा महेंदळे, भरतगड हायस्कूलच्या शिक्षिका सौ. संजना मसुरेकर यांनी केले. पौष्टिकता, उपयोग, आरोग्य विषयक लाभ, चव, मांडणी, इंधन बचत या मुद्द्यांआधारे परीक्षण करण्यात आले.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास कै. वर्षा विठ्ठल लाकम हिच्या स्मरणार्थ श्री. विठ्ठल लाकम यांस कडून रोख पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर सहभागी सर्व स्पर्धकांना शाळा व्यवस्थापनाकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.

यावेळी सरपंच सुचिता वांगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, उपाध्यक्ष दिपिका लाकम, मुख्याध्यापक प्रशांत पारकर, विठ्ठल लाकम, गणेश बागवे, गुरुनाथ ताम्हणकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन तेजल ताम्हणकर व कविता सापळे यांनी केले.

 

फोटो: 

मसुरे देऊळवाडा जी प शाळा येथील पाककला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी सहभागी सर्व स्पर्धक….

 छाया दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे