Home स्टोरी मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

113

मुंबई:  मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल कदम, महापालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, ‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार आणि कर्मचारी, ‘स्नेहा कॅटरर्स’चे भागीदार, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा या गुन्ह्यात उल्लेख केला आहे. हा घोटाळा अनुमाने ६ कोटी ३७ लाख रुपयांचा असल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले आहे.

 

कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांचाही आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला होता. संगीता हसनाळे या नियोजन विभागाच्या प्रमुख होत्या.